जांबरे येथे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी स्वखर्चातून केशरी रेशनकार्ड धारकांना वाटले मोफत धान्य - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2020

जांबरे येथे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी स्वखर्चातून केशरी रेशनकार्ड धारकांना वाटले मोफत धान्य

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी स्वखर्चातून केशरी शिधापत्रिका धारकाना स्वखर्चाने मोफत धान्य वाटप केले.
चंदगड / प्रतिनिधी
जांबरे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण विश्राम गावडे यांनी गावातील केशरी शिधापत्रिका धारकाना स्वखर्चाने मोफत धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
कोरोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केशरी शिधापत्रीका धारकांनाही कमी किमतीत  धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे गावातील १६९ केशरी शिधापत्रीका धारकांना ३३८किलो तांदूळ व ५१७ किलो गहू वाटप केले. प्रती किलो गहू -८ रुपये व प्रती किलो तांदूळ १२ रुपये प्रमाणे होणारे बिल लक्ष्मण गावडे यानी स्वतः देऊन एक महिन्याचे धान्य मोफत वाटप केले. या सामाजिक कार्याचे चंदगड तालूक्यात कौतूक होत आहे.धान्य वाटप सरपंच प्राजक्ता गावडे, विष्णू गावडे, पोलिस पाटील जाणकू गावडे, नामदेव गावडे, नागेश गावडे, विश्वनाथ देवणे, लुमाजी गावडे सुभाष कांबळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.


No comments:

Post a Comment