कोवाडसह - कर्यात भागात वळीव पावसाची हजेरी, उडाली सर्वांची तारांबळ - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2020

कोवाडसह - कर्यात भागात वळीव पावसाची हजेरी, उडाली सर्वांची तारांबळ

 चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरात पडलेला मुसळधार पाऊस.
कोवाड / प्रतिनिधी   
आज दुपारी साडेतीन वाजता गडगडाटासह कोवाडसह कर्यात भागात अचानक वळीव पावसाने हजेरी लावली. सकाळ पासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता .अशा परिस्थितीत आज साडेतीन पासून 6 वाजेपर्यंत पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे अवेळी झालेल्या या वळीव  पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.
कोवाड, कागणी, होसुर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कांर्वे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, शिनोळी, निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, मलतवाडी, लकीकट्टे, माणगाव, तांबूळवाडी, डुकुरवाडी, हलकर्णी, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी आदी भागात आज पावसाने तब्बल दोन तास  हजेरी लावली.  त्यामूळे हवेमध्ये कमालीचा गारठा जाणवत आहे. ऊस शेतीसाठी पाऊस गरजेचा असला तरीही कर्यात भागातील अनेक शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन सर्दी खोकला यासारखे आजार होण्याची संभावना असते अशा वेळी नागरिकांनी व घरातील लहान मुलांनी पावसामध्ये न भिजता घरामध्येच सुरक्षित रहावे,कारण सर्दी खोकला सारखा आजार होऊन सर्वांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण होते,असे आवाहन चंदगड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. के.खोत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment