![]() |
गरजूंना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करताना महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी. |
चंदगड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत र. भा. माङखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवकांनी आज सावर्डे, कोळींद्रे, शिपूर, हेरे, खामदळे, सुळये या गावातील गरीब, निराधार, अनाथ, गरजू लोकांना धान्य, जीवनावश्यक वस्तूं, मास्क वाटप केले. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीचे प्रबोधन व प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले.
यासाठी त्या- त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक व स्वय॓सेवकांचे उत्तम सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. पाटील व विद्यापीठ समन्वयक प्रा. अभय जायभाये व स्टाफचे प्रोत्साहन मिळाले. मदत व वितरणकार्य राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील, एनएसएस प्रतिनिधि श्रीपाद सामंत, अजय सातार्डेकर, परशुराम गावडे, स्नेहा हवालदार, श्रेया बांदेकर, प्रभळकर, आशुतोष गोसावी यांनी पार पाडले. इतर सर्व स्वयंसेवक स्वतःच्या घरी राहूनच सोशल मीडिया व इतर माध्यमातून प्रबोधन कार्य पार पाडत आहेत.
यावेळी स्वयसेवकांनी नागरीकांना कामाशिवाय बाहेर पडू नका, मास्कचा वापर प्रत्येकाने करा, सुरक्षित अंतर पाळा, बाहेरून गावात आलेल्या व्यक्तींची वेळीच माहिती द्या, त्यांची योग्य ती खबरदारी घ्या, वरचेवर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुवा, धुम्रपान वा इतर व्यसने करू नका, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका, प्रशासनाला सहकार्य करा, पोलिस, डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी हे आपल्यासाठी देवदूतच आहेत त्यांचा सन्मान व सहकार्य करा, जमेल तिथे व जमेल तसा सामाजिक मदतीसाठी हातभार लावा असे आवाहन करुन जनजागृती केली.
No comments:
Post a Comment