पार्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनीटायझरचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2020

पार्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनीटायझरचे वाटप

पार्ले ग्रामपंचायतीच्या वतीने नागरीकांना सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. 
चंदगड / प्रतिनिधी
पार्ले (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच सौ समृध्दी सुधाकर गावडे,उपसरपंच सौ धनश्री एकनाथ गावडे ,सदस्य  सौ गायञी गोविंद मयेकर,जोतिबा मारुती देवळी , सूर्यकांत कांबळे,पोलिस पाटील सखाराम बमु फोंडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष  सुधाकर गावडे, ग्रामसेवक सूरेश कोकणी,एकनाथ गावडे आदीच्या उपस्थितीत  नागरिकांना सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने कोरानाची खबरदारी म्हणून गावात कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे.
नागरिकांना मास्क लावणे,सोशल डिस्टसिंग राखणे,व सॅनेटयझरचाा  वापर करणेसंदर्भात ग्रामपंचायत व आरोग्य विभाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक यांच्या करवी गावातील नागरिकांचा तसेच बाहेर ठिकाणी नोकरी निमित्त असणार्या ग्रामस्थांचा सर्व्हे करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात खबरदारी घेण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment