कर्नाटकातून चंदगड तालुक्यात बकऱ्यांची अवैध्य वाहतुक करणाऱ्या गाडीवर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

30 April 2020

कर्नाटकातून चंदगड तालुक्यात बकऱ्यांची अवैध्य वाहतुक करणाऱ्या गाडीवर कारवाई

तुर्केवाडी चेक पोस्टवर सात जणांसोबत बारा बकरी चंदगड पोलिसांच्या ताब्यात

तुर्केवाडी (प्रतिनिधी) :.कर्नाटकातील रेड झोन घोषीत केलेल्या बेळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या वाघोली येथील सात लोकांसह बारा बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या हौदा रिक्षाला आज (बुधवारी) चंदगड पोलिसांनी गस्त घालत असताना तुर्केवाडी चेक पोस्ट जवळ ताब्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी चंदगडला पाठवण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात रेड झोनमधुन बकरी येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्हा रेड झोन घोषीत केल्यानंतर सीमाभागातील गावांनी सतर्क होत आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील वाघोडे येथून बकऱ्यांची वाहतुक करणारा हौदा रिक्षा सात लोकांसह 12 बकऱ्यांची चोरट्या मार्गाने वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले. तुर्केवाडी येथील चेक नाक्यावर याची चौकशी केली असता बेळगुंदी, सोनोलीमार्गे तुर्केवाडीपर्यंत हा हौदा रिक्षा आल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच तुर्केवाडी गावच्या पोलीस पाटील माधुरी दिगंबर कांबळे यांनी याठिकाणी पेट्रोलिंग करणारे हवालदार दिलीप पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. सदर रिक्षा वाहतूक परवाना व्हेजिटेबल परवाना असा बोर्ड लावून ही वाहतूक चालू होती. संपूर्ण सिमा बंदी असताना चंदगड तालुक्यातील मटन खव्याची हाऊस भागवण्यासाठी अशा पद्धतीने चोरट्या पद्धतीने बकऱ्यांची वाहतूक करत असताना हा टेम्पो सापडल्याने चंदगड तालुक्यातील मटन खानाऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर टेम्पो व्हेजिटेबल परवाना लावून वाहतूक करत असताना सापडल्याने बेळगाव प्रशासनाने अशा वाहनचालकांच्या  परराज्यात जाण्याची परवानगी दिली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे .रिक्षातून सात लोक प्रवास करत असताना हे निदर्शनास आले असून हे सातही लोक बेळगाव जिल्ह्यातील वाघोडे या गावचे रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. चंदगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्याकरिता चंदगड ग्रामीण रुग्णालय याठिकाणी पाठवले आहे .त्यामुळे हे रुग्ण हे कर्नाटकचे रेडझोन मधिल लोक चंदगड तालुक्यात आल्याने त्यांच्यावर सीमा बंदीचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment