स्वामी प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2020

स्वामी प्रतिष्ठान अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करताना सुधीर पाटील व अन्य सहकारी.
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात व चंदगड मतदार संघात लॉकडाऊन चालू आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या बरोबरच चंदगड, गडहिंग्लज व आजरा परिसरातील आर्थिकदुष्ट्या कमकुवत कुटुंब, निराधार, दिव्यांग व विधवा अशा गरजु नागरिकांना मदत पुरवण्याच्या उद्देशाने भाजपा नेते  शिवाजीराव पाटील यांच्या वतीने स्वामी प्रतिष्ठाण मार्फत गरजुं कुटुंबाना एक हजार किट्रसच्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. 
याचबरोबर अविरत सेवा बजावणारे पोलीस बांधव-भगिणी, सरकारी दवाखान्यातील कर्मचारी यांनीही मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आले. यापूर्वी स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवाजीराव पाटील यांनी पूरपरिस्थिती वेळी अनेक गर्जूना मदतीचा हात दिला होता. संपुर्ण चंदगड मतदारसंघात जीवनावश्यक वस्तूच्या 1000 किट्सचे  वितरण करण्यात आले. कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांनी सदर वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशाच प्रकारे अनेक हात हे समाजातील विविध स्तरातून येण्याची आज गरज आहे. 

No comments:

Post a Comment