काजूच्या झाडावरुन पडल्याने सातवणे येथील शेतकऱ्याचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2020

काजूच्या झाडावरुन पडल्याने सातवणे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

चंदगड / प्रतिनिधी
सातवणे (ता. चंदगड) येथील शेतामध्ये दत्त मंदिर शेजारी असलेल्या काजूच्या झाडावर काजू काढण्यासाठी चढलेल्या शेतकऱ्याचा झाडावरुन पडल्याने मृत्यू झाला. धोंडीबा बाळु पारसे (वय-57) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. आज दुपारी पावणेचार वाजता हि घटना घडली. विठ्ठल गुरव यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसांत दिली. 
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी – धोडींबा पारसे हे आज दुपारी आपल्या शेताकडे दत्त मंदिर शेजारी असलेल्या काजूच्या शेतात गेले होते. काजू काढण्यासाठी ते काजूच्या झाडावर चढले असताना हात सुटून झाडावरुन पडल्याने त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून हवालदार श्री. नांगरे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment