निट्टूर येथे डॉ. विनोद कोकितकर यांच्या गुरुकृपा क्लिनिक दवाखान्याचे उद्घाटन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2025

निट्टूर येथे डॉ. विनोद कोकितकर यांच्या गुरुकृपा क्लिनिक दवाखान्याचे उद्घाटन उत्साहात

 


कोवाड : सी एल वृत्तसेवा

       निट्टूर (ता. चंदगड) येथे के एल ई हॉस्पिटल बेळगाव चे डॉ. विनोद एस. कोकितकर (बीएएमएस, एमडी) यांच्या गुरुकृपा क्लिनिक हॉस्पिटलचे उद्घाटन मंगळवार दि. २३/०९/२०२५ रोजी उत्साहात पार पडले. सरपंच गुलाब पाटील यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन प्रसंगी पोलीस पाटील यल्लाप्पा पाटील, भारत खवनेवाडकर, सुभाना पाटील, माजी मुख्याध्यापक वाय. व्ही. कांबळे, दूध संस्था चेअरमन यल्लाप्पा चांगोजी पाटील, सेवानिवृत्त शिक्षक द. गु. कदम, डॉक्टर विनोद कोकितकर,  डॉ. सौ शितल विनोद कोकितकर (जनरल मेडिसिन,  स्त्री रोग व बाल रोग तज्ञ), निट्टूर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी,  मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.  

       क्लिनिकची वेळ रोज सायंकाळी ५ ते रात्री ८ असून हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी व उपचार, सोबत मणक्याचे आजार, संधिवात, सांधेदुखी, लकवा पोटाचे विकार ऑक्सिमीटर शुगर बीपी तपासणी, बालक व स्त्रियांचे सर्व प्रकारचे रोग, पंचकर्म चिकित्सा, सुवर्ण प्राशन आदी सूविधा मिळणार आहेत.

    मान्यवरांचे स्वागत डॉ. विनोद कोकितकर यांचे वडील व प्राथमिक शिक्षक सोनाप्पा कोकितकर (बुक्कीहाळ बुद्रुक) यांनी केले. डॉ. विनोद कोकितकर यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment