कालकुंद्री येथील रा. ना. पाटील गुरुजी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2025

कालकुंद्री येथील रा. ना. पाटील गुरुजी यांचे निधन

रामचंद्र नागोजी पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समिती संघटनेचे माजी अध्यक्ष, गावातील श्रीकृष्ण व महात्मा फुले दूध संस्थांचे संस्थापक चेअरमन, फुले दूध संस्थेचे विद्यमान चेअरमन, कोवाड येथील मोटर पंप भारत पतसंस्थेचे संस्थापक, अभ्यासू वक्ते रामचंद्र नागोजी पाटील तथा रा. ना. पाटील गुरुजी वय ८३ यांचे आज दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन चिरंजीव, चार कन्या, सुना , जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोवाड केंद्राचे केंद्रप्रमुख एस. के. पाटील (म्हाळेवाडी) यांचे ते सासरे होत.

अंत्यविधी कालकुंद्री स्मशानभूमी येथे दुपारी ११ वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment