आंबोली / प्रतिनिधी
गेळे (ता. सावंतवाडी) येथील शिक्षक आनंद सुरेश कदम (वय ३६ वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. १० रोजी दुपारी सुमारे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आंबोली गेळे कदमवाडी येथे घडली. या घटनेची खबर त्यांचा मोठा भाऊ सुनिल सुरेश कदम यांनी आंबोली पोलीसांत दिली.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार संतोष गलोले, हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ऊप निरीक्षक गवारे यांनी घटना स्थळी भेट देत माहीती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत एक चिठ्ठी मिळाली यात आपण टी. ई. टी. परीक्षेत पास होणार नाही असे त्या चिठ्ठीत लिहीले होते. ते सदया आंबोली गांवठणवाडी जि. प. शाळा नं.६ येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे आई वडील सकाळी साडे आठच्या गाडीने पुणे येथे जाण्यास निघाले होते. घरात कोणीही नाही तर पत्नी गडहिंग्लज येथे मुला सोबत राहते आणि आनंद ही तेथेच राहत असे या सर्वाचा फायदा घेत आनंदने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांने मृत्यु पूर्वी घरातील सर्व लाईट बंद केली होती.
शुक्रवारी सकाळी आनंद ठरल्या वेळेप्रमाणे शाळेत आला. शाळेत त्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तेससे यांच्या कडे शालेय पोषण आहार आहाराचे सर्व रेकॉर्ड ओके करून दिले. ऊरलेले पैसे जमा केले आणि आपल्या वडीलांची तब्तेत बरी नसल्याने आठ दिवसाची रजा मिळावी म्हणून अर्ज ही दिला होता.
शुक्रवारी सकाळी आनंदचे आई आणि वडील पुण्याला निघून गेले. तर मोठा भाऊ सुनिल आंबोलीतील एका हॉटेलात कामाला जायला निघाला. तर आनंद आपल्या पत्नी आणि मुलासह गडहिंग्लज येथे राहत असतो. त्याला एक मुलगा आहे तो पाचवी इयत्तेत शिकत आहे.
No comments:
Post a Comment