कोरज येथील बापूसाहेब शिरगांवकर यांना शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर, २६ ला कोल्हापूर येथे होणार वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2025

कोरज येथील बापूसाहेब शिरगांवकर यांना शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर, २६ ला कोल्हापूर येथे होणार वितरण

बापू शिरगांवकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गौरव गाथा सन्मान सोहळा कोल्हापूर २०२५ चा छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार कोरज (ता. चंदगड) येथील बापूसाहेब शिरगावकर यांना जाहीर झाला आहे.  


    श्री. शिरगावकर हे गेली १० वर्ष ऑल इंडिया ह्युमन राइट्स च्या माध्यमातून समाज सेवेत रुजू आहेत. ह्युमन राईट चे विभाग प्रमुख, तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव जिल्हा,जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे सांभाळत सद्या नॅशनल कमिटीचे मेंबर आहेत. तसेच ते भ्रष्टाचार जनजागृती समिती चंदगड सदस्य, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक कार्यात ते सहभागी असतात. त्यांच्या एकंदरीत सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता संजय मोहिते व आमदार राजे शिरसागर यांच्या हस्ते दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment