![]() |
मयत कर्जदार डॉ. विनोद मोकाशी यांच्या वारसांना चेक देताना कोवाड मर्चंट पतसंस्थेचे पदाधिकारी. |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील डॉ. विनोद दुंडाप्पा मोकाशी, वय ४९ यांचे ११/८/२०२३ रोजी आकस्मिक निधन झाले.
कोवाड (ता. चंदगड) येथील दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कडून त्यांनी ११/८/२०२३ रोजी ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. नियमितपणे कर्जाची परतफेड करत त्यांनी २५ हजार रुपये इतकी रक्कम संस्थेकडे जमा केली होती. दरम्यान २८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तथापि कोवाड मर्चंट पतसंस्थेने डॉ मोकाशी यांनी कर्ज घेताना त्यांच्या कर्जावर नाममात्र ६१६ रुपये भरून एलआयसी कडे विमा उतरवला होता.
कर्जदाराच्या निधनामुळे कर्ज रक्कम रुपये ७५ हजार पैकी शिल्लक कर्ज रक्कम रु. ५० हजार वजा जाता भरलेली २५ हजार रुपये रक्कम नुकतीच वारसदारांना संस्था कार्यालयात परत करण्यात आली. या रकमेचा धनादेश नुकताच चेअरमन दयानंद मोटूरे, व्हा. चेअरमन उत्तम मुळीक यांच्या हस्ते डॉ. विनोद यांचे वडील दुंडाप्पा मोकाशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विरूपाक्ष गणाचारी, बाळासाहेब वांद्रे, बी. के. पाटील, बंडू तोगले, कल्लाप्पा रामजी वांद्रे, कृष्णा कांबळे, रवी पाटील आदी संचालक, व्यवस्थापक मनोहर पाटील, एलआयसी प्रतिनिधी दयानंद पाटील आदींची उपस्थिती होती.
संस्थने भविष्याचा वेध घेत कर्जदार, ग्राहकांचा विमा उतरवला असल्याने मोकाशी कुटुंबियांना दिलासा मिळाला. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल संचालक मंडळाचे कौतुक होत असून ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
No comments:
Post a Comment