कोवाड मध्ये आढळला दुर्मिळ श्यामेलिअन जातीचा सरडा - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2020

कोवाड मध्ये आढळला दुर्मिळ श्यामेलिअन जातीचा सरडा

कोवाड मध्ये आढळला दुर्मिळ श्यामेलिअन जातीचा सरडा.
कोवाड / सी एल वृत्तसेवा ( संजय पाटील )
           गर्द हिरवाई,साद घालणारा वारा,पक्ष्यांचा चिवचिवाट,गर्द नवराई आणि मातीला असणारा आगळा वेगळा सुगंध अशा प्रकारे चंदगड तालुका निसर्गसंपन्नतेन नटलेला तालुका आहे .या ठिकाणी विविध जातीच्या अनेक प्रकारचे पशुपक्षी आढळून येतात. 
          याची प्रचिती कोवाड मध्ये सापडलेल्या अतिशय दुर्मिळ श्यामेलिअन जातीचा सरडा मुळे पुनश्च पाहायला मिळाली आहे. कागणी - कोवाड हद्दीत असलेल्या शेतवडीत शेतात काम करत असताना कागणीचे सर्पमित्र विनोद मारुती कांबळे यांना घोयरा अर्थातच दुर्मिळ श्यामेलिअन जातीचा सरडा दिसला.कुतूहलाचा पोटी अधिक जवळ जाऊन पाहिले असता हा अतिशय दुर्मिळ जातीचा सरपटणारा प्राणी आहे हे समजल्यावर त्याला पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडण्यात आले.
            या सरड्या बद्दल अधिक माहिती घेतली असता असे आढळून आले की,घोयरा अर्थातच  श्यामेलिअन जातीचा सरडा हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे.वातावरणानुसार रंग बदलण्यात हातखंडा असलेला हा सरपटणारा प्राणी आहे.आपल्या परसदारात,शेतवडीत आणि जाता येता सहज दिसणाऱ्या वर्गात मोडणाऱ्या सरड्या प्रमाणे हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही.त्याच वेगळेपण त्याच्या दिसण्यावरूनच समजते.खडबडीत दिसणार शरीर,एकावर एक शिरस्त्राण असं डोकं, वळलेली शेपूटआणि आखूड पाय त्याला पाहिल्यावर नक्कीच डायनासोर ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.याला ग्रामीन भागत भुईया नावाने ओळखले जाते. हा सरडा फुंक मारून डोळे फोडतो,विषारी असून चावा घेतो अश्या प्रकारे गैरसमज ग्रामीण भागात प्रचलित आहेत त्यामुळे तो दिसताच त्याला ठेचून मारले जाते तो कधीच वेगाने धावत नसल्यामुळे त्याला धोका पोचू नये म्हणून त्याला पकडुन सुरक्षित स्थळी सोडण्यात आले असेल्याचे यावेळी विनोंद कंबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment