जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन जॉब फेअरचे 25 ते 26 ऑगस्ट रोजी आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन जॉब फेअरचे 25 ते 26 ऑगस्ट रोजी आयोजन

कोल्हापूर / प्रतिनिधी
     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन जॉब फेअरचे दि. 25 ते 26 ऑगस्ट रोजी आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे. ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करावी जेणेकरुन कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
 इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएसद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.  इच्छुक युवक- युवतींनी 25 व 26 ऑगस्टपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  

No comments:

Post a Comment