चंदगड महाविद्यालयाला वाढीव फि कमी करण्यासंदर्भात निवेदन देताना मनसे पदाधिकारी. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
महाविद्यालय वाढीव फी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप उर्फ पिनू पाटील यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या प्रशासनास निवेदन देऊन फि कमी करण्याची मागणी केली.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महाविद्यालयाने मागील वर्षांच्या तुलनेत चालू वर्षात मोठ्या प्रमाणात फि वाढ केली आहे. या महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे ग्रामिण भागातील असल्याने ही वाढीव फी देऊन शिक्षण घेणे परवडणारे नाही. तफावतीच्या नावाखाली महाविद्यालय प्रचंड फि वसूल करत आहे. लॉक डाऊन नंतर प्रत्येकाचे संसार उध्वस्थ होत असताना वाढीव फी आकारणी करणे म्हणजे सर्वसामान्य कुंटूबाचे कंबरडे मोडण्याचा हा प्रकार आहे . एक तर महाविद्यालयाने ५० % फि घ्यावी किंवा मागील वर्षाप्रमाणे फि घेण्यात येण्याची मागणी या निवेदना तून करण्यात आली आहे.
महाविद्यालय प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून फि कमी नाही केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून करण्यात आला आहे. हे निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील, मनसे चंदगड तालूका प्रमूख राजू सुभेदार, ज्ञानेश्घर धुरी, प्रकाश बल्लाळ, परशराम मळवीकर, ओमकेश पाटील, कृष्णा कुंदेकर, प्रशांत कांबळे आदि जन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment