![]() |
ॲम्बुलन्स संग्रहिच छयाचित्र |
कागणी : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील गुरुवार दि. २० रोजी चंदगड व गडहिंग्लज दौऱ्यावर येत असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.
सकाळी 11 वा. चंदगड ग्रामीण रुग्णालय आवारात आमदार पाटील यांच्या कोविड निधीतून ॲम्बुलन्स प्रदान कार्यक्रम होईल. यानंतर ११.३o वा. तहसील कार्यालयात आरोग्य खात्यातर्फे आढावा बैठक होणार आहे.
![]() |
राजेंद्र पाटील-यड्रावकर संजय मंडलिक राजेश पाटील सतीश पाटील |
सदर कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी आणि काही मोजके लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कोरोना संसर्ग असल्यामुळे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये असे आवाहन राजेश पाटील यांनी केले आहे.
या दौऱ्याबाबत आमदार राजेश पाटील म्हणाले, कोल्हापूरहून चंदगड तालुका हा खूप दूर असून येथे मोठ्या वैद्यकीय सुविधांची वानवा आहे, आरोग्य सेवेबाबत आढावा घेऊन जादा सुविधा कशा देण्यात येतील याबाबतचे प्रस्ताव मंत्री यड्रावकर यांना सादर करणार आहोत. चंदगड, आजरासह गडहिंग्लज येथे रुग्णांच्या बेडची संख्या वाढविण्याबाबत प्रस्ताव ही सादर करणार आहोत.
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा दौरा असा...
मंत्री यड्रावकर हे गुरूवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर येथील निवासस्थानाहून चंदगडकडे प्रयाण करतील. ११ वा. चंदगड ग्रामीण रुग्णालय रुग्णालय आवारात ॲम्बुलन्स प्रदान कार्यक्रम होईल. यानंतर 11:30 वाजता तहसील कार्यालयामध्ये आरोग्य खात्याची आढावा बैठक होणार आहे. यानंतर मंत्री यड्रावकर हे गडहिंग्लज कडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वा. गडहिंग्लज येथे ॲम्बुलन्स प्रदान कार्यक्रम व तहसील कार्यालयात आढावा बैठक होईल. त्यानंतर ते कोल्हापूर येथे रवाना होतील.
No comments:
Post a Comment