वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २० (बिनविषारी साप) हरणटोळ / सर्पटोळ - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २० (बिनविषारी साप) हरणटोळ / सर्पटोळ

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका 
 भाग : २० (बिनविषारी साप) हरणटोळ / सर्पटोळ
                      हरणटोळ ( Green Vine (Whip) Snake) 
       विविध भागात याला माळीण, सर्पटोळ, सापटोळी नावाने संबोधले जाते. रंगाने हिरवा, फिक्कट हिरवा, पोपटी, गडद हिरवा, कधीकधी काळपट तपकिरी रंगात सुद्धा आढळतो. पूर्ण वाढ झालेल्या हरणटोळ सापाची लांबी ९० सेंटिमीटर ते दोन मीटरपर्यंत असू शकते. शरीराची घेरी सुमारे दोन सेंटिमीटर असते.
      हरणटोळ हा भारतात सर्वत्र आढळतो विशेषतः उष्ण हवामानातील दाट जंगले(सह्याद्री, पश्चिम घाट), हिरवी झाडे झुडपे व गवतात अधिक सापडतो. हा साप हा पूर्णपणे झाडावरच राहतो आणि जगतो, नेहमी वेलींवर किंवा फांद्यांवर दिसून येतो. याचे खाद्य छोटे पक्षी, त्यांची अंडी, पाली, सरडे, झाडांवरील किडे हे आहे.
     आपल्या लांब जिभेच्या साह्याने तो आजूबाजूच्या स्तिथी चा अंदाज घेत असतो. घाबरला असता तो स्वताला फुगवून मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो.
       लांब शेपटी चा वापर झाडावर चढताना किंवा शिकार करताना माकडा सारखा फांद्यांना पकडण्यासाठी करतो. इतर सापांच्या तुलनेत याचे डोके मोठे व पक्ष्यांच्या चोची सारखे लांबट असते, डोक्याच्या टोकाला तोंड आणि नाक असते.
    हरणटोळ हा एक धीम्या गतीचा साप असून तो स्वताला सुरक्षित ठेवण्यासाठी  पूर्णपणे आपल्या त्वचेच्या रंगावर अवलंबून असतो.  तो आपले भक्ष डसून त्यामध्ये विष सोडून त्याला अक्क्खा गिळतो.
      हरणटोळ हा माणसासाठी किंचित विषारी आहे. याच्या चाव्यामुळे चावलेल्या ठिकाणी जळजळ होते. जरी स्वभावाने शांत असला तरी कधी कधी चिडून तो चावा घेतो, त्याच्या जबड्याच्या मागील दातांमध्ये विष असते. याच्या जवळ गेल्यावर माणसाच्या कपाळावर मारतो (विशेषतः माणसाचा डोकी च्या उंची एवढ्या झुडपावर किंवा वेलींवर वावरत असतो) असा ग्रामीण भागात समज आहे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment