चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील कानूर जवळील भोगोली गावाजवळील जंगलातील बिबट्या आणि लहान पिल्लू खाद्याच्या शोधात गावाजवळ येऊन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत वनखात्याकडूनही आवश्यक ती दक्षता घेतली जात असल्याची माहिती चंदगड वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले.
सदर बिबट्या शुक्रवारी गावातील मराठी शाळेजवळ असणाऱ्या पोल्ट्री फार्म जवळ येऊन गेल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी काढला होता. पोल्ट्रीतील मृत्यू झालेल्या कोंबड्या उघड्यावर टाकल्याने बिबट्या आला असावा, असा अंदाज वन खात्याकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वनखात्याकडूनही दक्षता घेतली जात आहे. गावांमध्ये रोज सायंकाळी वनखात्याचे पथक लक्ष ठेवून आहेत वनपाल पावसकर, वनरक्षक होगले तसेच हत्ती हाकारा पथक ही तैनात करण्यात आले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment