ओलम शुगर कडून ३४०० + १०० रू. दर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2025

ओलम शुगर कडून ३४०० + १०० रू. दर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश

 

राजगोळी खुर्द : कारखान्याचे युनिट हेड संतोष देसाई दराबाबतचे पत्र सुपूर्द करताना राजेंद्र गड्ड्यानावर संग्राम पाटील प्रा दीपक पाटील माजी मंत्री शशिकांत नाईक काडसिद्धेश्वर स्वामी आदी मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे दोन दिवस सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची सांगता सोमवारी सायंकाळी आठ वाजता झाली. ३४०० दराऐवजी ३६०० रुपये दर द्या, तसेच थकित देणे द्या. या मागणीसाठी सदर आंदोलन सुरू होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ओलम साखर कारखान्याचे युनिट हेड संतोष देसाई शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य महाराष्ट्र राज्य सचिव गड्ड्यानावर, प्रा. दीपक पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक, काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याशी चर्चा करून पहिली उचल ३४०० व हंगामा नंतर १०० रुपये असा ३५०० रुपये दर देण्याचे मान्य केले यानंतर सदर आंदोलन थांबवण्यात आले. 

        कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या ३५०० रूपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला. मात्र चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५ कारखान्यांनी संघटित होवून ३४०० रूपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम  साखर कारखान्यावर आंदोलन करून गाळप बंद केले होते. 

      रविवारी रात्रभर माजी खासदार राजू शेट्टी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक शिवापुर येथील काडसिद्धेश्वर स्वामी राजेंद्र गड्ड्यानावर प्रा. दीपक पाटील, जगनाथ हुलजी यांनी ठिय्या आंदोलन करून मुक्काम ठोकला होता.

     चालू वर्षी इको केन, दौलत, ओलम, आजरा साखर कारखाना व आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावास बळी पडून 3400 रूपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप यावेळी शेतकरी नेत्यांनी केला.

No comments:

Post a Comment