चंदगड नगरपंचायत : राजर्षी शाहू विकास आघाडीचा बुधवारी सकाळी प्रचार शुभारंभ, माजी आ. राजेश पाटील, डॉ. नंदिनी बाभुळकर, गोपाळराव पाटील यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2025

चंदगड नगरपंचायत : राजर्षी शाहू विकास आघाडीचा बुधवारी सकाळी प्रचार शुभारंभ, माजी आ. राजेश पाटील, डॉ. नंदिनी बाभुळकर, गोपाळराव पाटील यांची उपस्थिती

  

दयानंद काणेकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   चंदगड नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता चंदगड येथील रवळनाथ मंदिर येथून सुरू होईल अशी माहिती संजय चंदगडकर यांनी दिली.

   यावेळी माजी आमदार राजेश पाटील, शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभुळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

     यावेळी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद काणेकर म्हणाले, पाच वर्षांमध्ये कोट्यवधींची विकासकामे करून चंदगड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही चंदगड शहराचा विकास करण्याची संधी मला द्यावी. विकासाच्या मुद्द्यावर आणि पारदर्शी नगरपंचायत प्रशासन या मुद्द्यावरच आम्ही मतदारासमोर जाणार आहे. आमच्या आघाडीवर चंदगडची जनता विश्वास ठेवून आम्हाला न्याय देईल, यात नक्कीच शंका नाही.

No comments:

Post a Comment