चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या वतीने बेळगाव शहर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळा आवारात टॉयलेट तसेच पोलिओ निर्मूलन क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थांच्या मदतीसाठी मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी व टीव्ही मालिकांतील सुप्रसिद्ध विनोदवीर अभिनेते भाऊ कदम व सहकलाकार यांचे गाजलेले फुल टू धमाल नाटक 'सिरीयल किलर' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता के एल इ सोसायटी च्या सेंचुरी एडिटोरियम हॉल (बी. एस. जिरगे हॉल) नेहरूनगर बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
मदत निधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाची देणगी तिकिटे घेऊन आपण सहकुटुंब नाटकाचा आनंद लुटावा. असे आवाहन रोटरी क्लबचे पदाधिकारी डी. बी. पाटील, किशोर जगदाळे, राहुल आंबेवाडी, महेश अनगोळकर, निवृत्त नौदल अधिकारी अशोक पाटील आदींनी केले आहे. रसिक प्रेक्षक व दानशूर व्यक्तींनी यासाठी सहकार्य करावे. देणगी तिकिटे मागणीसाठी रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब सेवाभावी संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment