प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची प्रचार फेरी, नगराध्यक्ष दयानंद काणेकर यांच्यासह नगरसेवक प्रसाद वाडकर यांचा प्रचार - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2025

प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची प्रचार फेरी, नगराध्यक्ष दयानंद काणेकर यांच्यासह नगरसेवक प्रसाद वाडकर यांचा प्रचार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार दयानंद सुधाकर काणेकर व प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रसाद गणपती वाडकर यांच्या प्रचारार्थ रामदेव गल्ली संभाजी गल्ली रोहिदास नगर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची पोहोचपावती म्हणून राजश्री शाहू विकास आघाडीला साथ द्या असे आवाहन यावेळी संजय चंदगडकर यांनी केले. या प्रचार फेरीमध्ये संजय चंदगडकर, रवळनाथ सुतार, चंद्रकांत दाणी, निंगाप्पा पाटील, उमेदवार प्रसाद वाडकर, सचिन राजापूरकर, सुजित वाडकर, संदीप राजापूरकर, प्रशांत वाडकर, सुनील वाडकर, संदीप वाडकर, अक्षय वाडकर श्रीकांत हवालदार इत्यादी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment