खासदार धनंजय महाडिक व भाजपच्या जिल्हा सरचिटणीस सुशिला पाटील यांची लक्ष्मण गावडे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2025

खासदार धनंजय महाडिक व भाजपच्या जिल्हा सरचिटणीस सुशिला पाटील यांची लक्ष्मण गावडे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

 

खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष्मण गावडे यांच्या निवडीबद्दल त्यांच्या कार्यालयाला भेट दिली.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चंदगड तालुकाध्यक्ष व (महाराष्ट्र राज्य संयोजक (भा. ज. पा.) सेवा उद्योग समितीचे लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या संपर्क कार्यालयाला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देवून श्री. गावडे यांच्या निवडबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.  

लक्ष्मण गावडे यांचा निवडीबद्दल सत्कार करताना भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. सुशिला पाटील

    सौ. सुशिला लक्ष्मण पाटील (जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी) कोल्हापूर ग्रामीण (पश्चिम) सौ. मंगल सचिन वाके (अध्यक्ष महिला मंडळ) सौ. गायत्री गुरुनाथ बल्लाळ यांनी सदिच्छा भेट दिली. चंदगड नगरपंचायत भाजपा आघाडी प्रचाराचा आढावा घेतला. 

अनिल दळवी, मारुती शिट्याळकर, सुरेश नेसरकर, विजय गावडे निवडीबद्दल लक्ष्मण गावडे यांचा सत्कार करताना.

       तसेच माजी शिवसेना तालुका प्रमुख अनिल दळवी, मारुती शिट्याळकर, सुरेश नेसरकर, विजय गावडे यांनीही लक्ष्मण गावडे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट देत सत्कार केला.

No comments:

Post a Comment