![]() |
| अथर्व मोरे कु. ग्रीष्मा गावडे रोहन गावडे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे (ता. चंदगड) येथील विद्यार्थांनी वरीष्ठ गट प्रश्न मंजुषा स्पर्धेत तालुक्यात द्वीतीय क्रमांक पटकावला. यामध्ये रोहन विजय गावडे (इ. ७ वी), अथर्व सागर मोरे (इ. ६ वी) व कु. ग्रीष्मा गणपतराव गावडे (इ. ६ वी) यांनी हे यश मिळविले. या विद्यार्थांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांच्यासह सागर मोरे, मधुकर पाटील, महेश जांबोटकर, दत्तात्रय गणाचारी, संदिप नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment