चंदगड नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सुमारे आठ हजार इतके मतदार आहेत. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांना विविध प्रकारची चिन्हे वाटप करण्यात आली.
बुधवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी येथील निवडणूक विभागातर्फे राजर्षी शाहू विकास आघाडी, भाजप व शिवसेना युती व शिवसेना, शिवसेना उबाठा गट तसेच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. येथील निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला नारळ, भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे गट युतीला कमळ व धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले. युती तर्फे नगराध्यक्षपदासह १६ उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर तर २ उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत. बहुजन समाज पक्ष उमेदवार हत्ती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल या चिन्हावर लढत आहे. यावेळी अपक्ष उमेदवारांनाही पाण्याची टाकी, कंदील तसेच अन्य विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले.

No comments:
Post a Comment