चंदगड : सी एल वृत्तसेवा
मोटणवाडी (ता. चंदगड) येथे चंदगड पोलिसांनी कारवाई करून एका दुचाकीसह ४८ हजार रुपयांची बेकायदा वाहतूक होणारी दारू जप्त करण्यात आली. पाटणे फाट्याच्या दिशेने येताना मोटनवाडी गावाजवळ वसंत सोनार यांच्या शेताजवळ बुधवारी दुपारनंतर ही कारवाई केली. संशयित आरोपीकडून ६० हजार रुपयांच्या दुचाकी व गोवा बनावटीची ४८ हजार रुपयांची दारू ताब्यात घेतली. या प्रकरणी रूपराज परशुराम घव्हाळे (वय २२, रा. गणेश गल्ली, गणेशनगर, इचलकरंजी, ता. हातकलंगणे) व इब्राहिमपूर, गोवा येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:
Post a Comment