मन्नीकेरीच्या त्या जवानावर रविवारी अंत्यसंस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

मन्नीकेरीच्या त्या जवानावर रविवारी अंत्यसंस्कार

बेळगाव / प्रतिनिधी
       मन्निकेरी (ता. बेळगाव) येथील रहिवासी व नाशिक येथे सैन्यदलात नायक म्हणून कार्यरत असणारे जवान फकिरा शट्टू गुडाजी (वय 38) यांचे गुरुवारी सेवेत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी मन्नीकेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. महिन्याभरा पूर्वी ते आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानिमित्ताने गावी आले होते. घटनेने मन्नीकेरी गावावर शोककळा पसरली आहे.
         त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. नाशिक येथील आर्मी सेंटरमध्ये ते कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. दोन दिवसानंतर त्यांच्या पार्थिववर मन्नीकेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा  मन्निकेरेमध्ये व 10 वी पर्यंतचे शिक्षण हंदीगनूर मध्ये झाले. मन्नीकेरी येथील माजी ग्राम पंचायत सदस्य बाळाप्पा गुडाजी यांचे ते भाऊ तर बेकिनकेरे येथील एसडीएमसी अद्यक्ष मल्लाप्पा गावडे यांचे ते मेहुणे होते.

No comments:

Post a Comment