हलकर्णी फाटा येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

हलकर्णी फाटा येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

हलकर्णी फाटा ता चंदगड येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन करताना आम.राजेश पाटील, बाजूला संग्राम कूपेकर, सौ. कोदाळकर, राणे आदी

चंदगड/प्रतिनिधी:-- हलकर्णी फाटा ता चंदगड येथे   महाराष्ट्रात गरीब, गरजू , स्थलांतरीत व अनाथ लोकांसाठी चालू केलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत संचालिका सौ.निलम कोदाळकर यानी केले. 
शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी हि गोरगरीब जनतेसाठी असून परिसरातील गरजू व कष्टकरी  लोकांनी याचा लाभ घ्यावा ,तसेच गरज पडल्यास  याची संख्याही वाढवण्यासाठी पाठपुरावा करू असे आवाहन  आमदार  पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर,माजी सभापती शांताराम पाटील, तालुका संघाचे संचालक जानबा उर्फ बाळू चौगुले , माजी शिक्षण सभापती भरमांण्णा गावडे, हलकर्णी सरपंच एकनाथ कांबळे, प्रांत ग्राहकचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राणे,प्रसाद कोदाळकर, आनंद वारंग, रायमन फर्नांडिस,मारूती हदगल,बापू मटकर ,गजानन पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment