कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी विद्याधर गुरबे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी विद्याधर गुरबे यांची निवड

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल विद्याधर बाबुराव गुरबे यांना निवडीचे पत्र देताना  जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील.
चंदगड / प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य विद्याधर बाबुराव गुरबे यांची निवड  व तसेच गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले.
      विद्याधर गुरबे हे सध्या गडहिंग्लज पंचायत समितीचे सदस्य व गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले आहे. बंटी पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते अोळखले जातात. गुरबे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात युवक काँग्रेसमधून झाली. त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात मरगऴेल्या अवस्थेतील काँग्रेसला ऊर्जीतावस्था देणे तसेच तळागाळामध्ये काँग्रेस रुजविण्यात मोलाचे योगदान आहे. आजरा व चंदगड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत घवघवीत यश प्राप्त करून दिले मुळेच चंदगड आजरा गडिंग्लज  मजबूत करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याचे चर्चा सुरू आहे.


No comments:

Post a Comment