माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2020

माझं नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

चंदगड येथे पदवीधर व शिक्षक शिक्षक मतदार संघ उमेदवार प्रचारार्थ मेळावा

चंदगड येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचार मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भरमूआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, शांताराम पाटील, मल्लीकार्जून मुगेरी, समृद्धी काणेकर आदी.

चंदगड / प्रतिनिधी

           पुणे पदवीधर मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात महायुतीने विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. दिवसातून चार वेळा माझ्या नावाचा जप या लोकांनी सुरू ठेवला आहे. आज -काल रात्री नाव घेतल्याशिवाय या दोघांना झोप येत नाही. भाजपच्या संघटनात्मक जोरावर या मतदारसंघात पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार हे नक्की विजयी होणार आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

        चंदगड येथे भाजपचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

       चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ``लोकांना हे माहित आहे की मराठा आरक्षण कोणी दिले व कोणी घालवले हे युवक वर्गाला माहित आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात टिकवला. सुप्रीम कोर्टात एक वर्ष हा प्रश्न टिकवून धरला होता. पण महाआघाडी सरकार आले आणि आरक्षण टिकले नाही हे कुणी केले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत आमची भूमिका काय होती हे मुश्रीफ, अजित पवार व जयंत पाटील यांनी सांगायची गरज नाही. भाजपने दिलेले पदवीधर व शिक्षकचे उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे व  लढवय्यी वृत्तीचे असल्याने नक्की निवडून येतील. 

यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील व शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. तालुकाध्यक्ष मल्लीकार्जून मुगेरी, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणेकर, माजी सभापती शांताराम पाटील, समृद्धी काणेकर, रत्नप्रभा देसाई, राम पाटील, संदीप नांदवडेकर, नितीन फाटक, भावकु गुरव, भरमू पाटील सुनील काणेकर आदीसह पदवीधर व शिक्षक उपस्थित होते.





No comments:

Post a Comment