मिरवेल शाळेला वर्षभरापासून शिक्षकच नाही, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

मिरवेल शाळेला वर्षभरापासून शिक्षकच नाही, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे गाव असलेल्या मिरवेल येथील प्राथमिक शाळेला वर्षभरापासून शिक्षण विभागाने शिक्षकच दिला नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याबरोबर शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे .

          किल्ले पारगडच्या पायथ्याशी वसलेल्या मिरवेल गावी जिल्हा परिषदेची चौथी पर्यंत ची प्राथमिक शाळा आहे. ५ मूले या शाळेत शिक्षण घेत आहेत. शासनाने बालकांचा शिक्षणाचा  मोफत हक्क ,सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षणामध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले, मात्र दुर्गम भागातील शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरताना चालढकल सूरू आहे, त्यामुळे शासनाकडूनच प्राथमिक शिक्षणाचा गळा घोटण्याचा हा प्रकार सूरू असलेची चर्चा सूरू आहे. त्यामुळे मिरवेल सह तालूक्यातील शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तात्काळ भरावीत अशी मागणी पालक वर्गातन होत आहे. तिलारी जवळील नगरगाव या शाळेतही वर्षभरापासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार आहे.

         मिरवेल गावात शासनाची प्राथमिक शाळा आहे, ईमारत, किचनशेड व शौचालय आदी भौतिक सुविधा आहेत. पण शिक्षक नाहीत. २५ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट दिवशी ध्वज फडकवायला स्वत:ला जावे लगत आहे. त्यामुळे या शाळेला ध्वज फडकवायला तरी कामगारी शिक्षक द्यावा.

संतोष पवार (सरपंच, पारगड-मिरवेल-नामखोल) 



No comments:

Post a Comment