महागाव येथे एस. जी. एम.शब्दगौरव वक्तुत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

महागाव येथे एस. जी. एम.शब्दगौरव वक्तुत्व स्पर्धेचे आयोजन

चंदगड (प्रतिनिधी) 

          महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहात यशवंतराव चव्हाण जन्मदिनानिमित्य १२ मार्च रोजी जिल्हास्तरीय एस. जी. एम. शब्दगौरव वक्तुत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.     ही स्पर्धा निशुल्क असून इ. 8 ते 12 वर्गातील शालेय विद्यार्थांनी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी केले आहे.

    कोरोना महामारीच्या कारणामुळे प्राथमिक फेरी (दि.10) रोजी नलाईन माध्यमाद्वारे होणार आहे. तर निवडक विद्यार्थांची (दि.12) रोजी प्रत्यक्ष उपस्थितीत कॉलेज कॅम्पस मध्ये होणार आहे. यासाठी  यशवंतराव चव्हाण याचें कार्य; शोध आणि बोध, तंत्रज्ञान ;काळाची गरज, कोरोना नको ना! आणि शोध आनंदी आरोग्य जिवनाचा या विषयावर स्पर्धा होणार आहे. विजेत्याना आकर्षक बक्षिसासह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थानी 9 मार्च दुपारी दोन पर्यंत https://forms.gle/z6mGhbxMt2pvzXUT7 या लिंक वर नावे नोंदवावीत अधिक माहितीसाठी 9970572883 या क्रमांकावर माहिती घ्यावी असे आवाहन केले आहे.



No comments:

Post a Comment