प्रा. मोहन घोळसे यांना इंग्रजी विषयातील पी. एच. डी प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

प्रा. मोहन घोळसे यांना इंग्रजी विषयातील पी. एच. डी प्रदान

प्रा. मोहन घोळसे


तेऊरवाडी / सी.एल. वृत्तसेवा

     कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक मोहन घोळसे यांनी शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातील पी. एच. डी. पदवी संपादन केली.

   प्रा. घोळसे यांनी `द नाव्हेल्स ऑफ टिमोथी  फिन्डले- अ सायकोअॅनालिटीकल स्टडी` या विषयावर आपला शोधप्रबंध शिवाजी विद्यापिठाला सादर केला होता. याकामी त्यांना कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापिठ इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. भांबर, सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील यांचे सहकार्य लाभले. याबद्दल प्रा. डॉ. मोहन घोळसे यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment