अडकुर येथे एका ऊसतोड मजुराची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

अडकुर येथे एका ऊसतोड मजुराची आत्महत्या

चंदगड / प्रतिनिधी

      अडकुर (ता. चंदगड) येथे बाळासाहेब ब्रम्हदेव उचगिरे (मूळ गाव मोहकेळ तालुका धारोळी जिल्हा बीड) सध्या रा. अडकुर याने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी (ता. 7) सकाळी पावणेआठ ते अकराच्या दरम्यान हि घटना घडली. अडकूर गावच्या हद्दीत परीट ओढ्याजवळ करंजाचे झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब हा ऊस तोडणी कामगार होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून श्री. पाटील तपास करत आहेत. No comments:

Post a Comment