![]() |
वैष्णवी विश्वास पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव-महामार्गावरील शिनोळी नजिक पाठीमागुन ट्रक ने ॲक्टीव्हा गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वैष्णवी विश्वास पाटील (वय वर्षे 21रा.शिवनगे ता.चंदगड) हि महाविद्यालयीन यूवती ठार झाली.
तर तिचे वडील विश्वास तुकाराम पाटील हे जखमी झाले. विश्वास पाटील हे आपल्या अक्टिव्हा दुचाकी ( क्र. एम एच ०९ इ एक्स ६८०७ ) वरून मुलगी वैष्णवीसह बेळगावला जात होते.याचवेळी शिनोळी नजिक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने ( क्र. के ए २२ सि ३०९७ ) जोराची धडक दिली. यामध्ये विश्वास हे रस्त्याबाहेर फेकले गेले तर वैष्णवी ही ट्रक खाली सापडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी ही हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी. एस सी. भाग २ मध्ये शिकत होती. वर्गात हुशार असलेल्या विद्यार्थिनीच्या अचानक जाण्याने महाविद्यालय व शिवणगे पंचक्रोशीत शोककळा पसरली. तिच्या मागे आई, वडील, भाऊ बहिण असा परिवार आहे. रात्री अकरा वाजता वैष्णवीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment