संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच चंदगड तालुका संघाची गुरूवारी ऑनलाईन वार्षिक सभा - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच चंदगड तालुका संघाची गुरूवारी ऑनलाईन वार्षिक सभा

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार २५ मार्च २०२१ रोजी दुपारी १ वाजता हलकर्णी फाटा ता चंदगड येथील तूलसी बाझार सभागृहात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आम.राजेश पाटील यांनी दिली. 

      कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर व शासनाच्या नियमानुसार या सभेला फक्त ५० सभासदांना प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरित सभासदांनी या वार्षिक सभेला संघाच्या सर्व शाखामध्ये आँनलाईन सूविधा उपलब्ध केल्या आहेत. या https://Zoom.us/j/95396636580?pwd=MW1wc2fnSkpBWT|1c|NpaU J|a1Y5UT09 लिंक (मिटींग आय डी.95396636580,पासकोड ctst) या लिंकवर सभासदांनी या सभेत सहभागी व्हावे असे आवाहन व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment