![]() |
पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्रांतर्गत बंदिस्त झालेले पाणवठे वनकर्मचारी यांनी श्रमदानातुन पुर्नजिवीत केले. |
चंदगड / प्रतिनिधी
पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्रांतर्गत 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वनक्षेत्रातील बंदिस्त झालेले पाणवठे वनकर्मचारी यांनी श्रमदानातुन पुर्नजिवीत केले. गाळ, माती, पाळापाचोळा, अनावश्यक तणे काढलेनंतर पाणवठे पुर्नजिवीत झाले. तसेच लहान जल स्त्रेतामध्ये पाळापाचोळा पडल्याने पाण्यास दुर्गंधी येत होती. अशा ठिकाणी पाण्यातील पाळापाचोळा, गाळाची माती काढुन दगडांच्या रचलेल्या बांधाची डागडुजी केली. त्यामुळे पाणी शुध्द होऊन, साठवण श्रमता वाढली त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांची पाण्याची भटकंती नक्कीच थांबेल. प्र.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल बी. आर. भांडकोळी, एन. एम. धामणकर, वनरक्षक डि. एस. रावळेवाड, डि. ए. कदम, वनसेवक तुकाराम गुरव, मोहन तुपारे, पुंडलिक नागुर्डेकर, चंद्रकांत बांदेकर व विश्वनाथ नार्वेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment