जागतिक जल दिनानिमित प्रिन्स पाईप्स कंपनीने राबविले किणी येथे तलाव स्वच्छता अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

जागतिक जल दिनानिमित प्रिन्स पाईप्स कंपनीने राबविले किणी येथे तलाव स्वच्छता अभियान

किणी (ता. चंदगड) येथे प्रिन्स पाईप कंपनीच्या वतीने जलदिनानिमत तलाव स्वच्छता करताना ग्रामस्थ व कर्मचारी.

चंदगड / प्रतिनिधी

      शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहती मधील  प्रिन्स पाईप्स या कंपनीने जागतिक जल दिनानिमित किणी ता चंदगड येथील तलावाची स्वच्छता केली.या निमित्त विद्यार्थ्यां व पालकांनी पाणी वाचवण्याची शपथ घेतली.यावेळी पर्यावरण/आरोग्य सुरक्षा अधिकारी जीवन गाडे यांनी स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या  नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे  व त्यांच्या  शाश्वत संरक्षणासाठी  कार्यरत राहणे  ही काळाची गरज असल्याचे सांगितले. एचआर विभाग प्रमुख  कल्लाप्पा कोकितकर यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले, पाण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे काळाची गरज आहे.  

जागतिक जलदिनानिमत किणी ता चंदगड येथे पाणी वाचवण्याची शपथ घेतांना विद्यार्थी 

     यावेळी कंपनीचे यूनीट हेड प्रदीप माने, जयप्रकाश विद्यालयाचे  मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर, वैजनाथ गडकरी, श्रीपाद  शानबाग, विवेक मनगुतकर, किसन पाटील सरपंच संदीप बिर्जे, पोलीस पाटील रणजित गणचारी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील, गजानन कुंभार, अभिजित जोशीलकर, संदीप जोशीलकर, विष्णू मनगुतकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment