चंदगड आगाराची कुदनुर-कोल्हापूर बस सुरू, प्रवासी वर्गातून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

चंदगड आगाराची कुदनुर-कोल्हापूर बस सुरू, प्रवासी वर्गातून समाधान

वर्षानंतर प्रथमच आलेल्या कुदनुर- कोल्हापूर बसचे कालकुंद्री ग्रामस्थांनी वाहक, चालकांना फेटे बांधून उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी श्रीकांत पाटील, एस पी पाटील, तुकाराम जोशी, किसन लोहार हरीश, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोरोनामुळे वर्षभर बंद असलेली दुपारची कुदनुर- कोल्हापूर बस आज बुधवार दि. २४  मार्च पासून चंदगड आगाराने पुन्हा सुरू केली आहे. या सेवेमुळे मार्गावरील प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

      चंदगड आगाराची दुपारी साडेतीन वाजता  कुदनूर हून सुटणारी कोल्हापूर बस दुपारी दीड वाजता चंदगड आगारातून निघते  मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, कडलगे, नागरदळे, किणी, कोवाड, कागणी, कालकुंद्री ते कुदनुर येऊन दुपारी साडेतीन वाजता परतीच्या प्रवासात कुदनुर, कालकुंद्री, कोवाड, तेऊरवाडी, नेसरी, महागाव, गडहिंग्लज मार्गे  सायंकाळी सात वाजता कोल्हापूरला पोचते. ही बस बंद असल्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत होती. प्रवाशांची गरज ओळखून आगार व्यवस्थापक जी के गाडवे यांनी बस सुरू केली आहे. याबाबत सीएल न्यूजने पाठपुरावा केला होता.

       चंदगड हून कोवाड भागात येणारे नागरिक, कॉलेज विद्यार्थी तसेच कुदनूर, कोवाड भागातून दुपारच्या वेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस उपयुक्त असून या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिसरातील ग्रामपंचायतींसह आगार व्यवस्थापक जी. के. गाडवे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए. डी. मुल्ला आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment