अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाचीतील एकास शिक्षा - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाचीतील एकास शिक्षा

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
   भरधाव मोटरसायकल चालवून नागोजी धुळाप्‍पा मरगाळे, वय ६२ रा. महिपाळगड, ता. चंदगड यास गंभीर जखमी केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने बाची, ता. जि. बेळगाव येथील लक्ष्मण आप्पांना गुंजीकर वय ५८ यास चंदगड न्यायालयाने एक महिन्याची साधी कैद व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
८ जानेवारी २०१७ रोजी शिनोळी येथील वीज मंडळ कार्यालयाजवळुन चालत जाणाऱ्या मरगाळे यांना गुंजीकर याने जोराची धडक देऊन जखमी केले होते. याबाबत सहा. फौजदार एच एस नाईक यांनी तपास केला होता. गुन्ह्याची सुनावणी आज २४ मार्च रोजी होऊन भा दं वि स कलम २७९,३३८ व मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी वकील म्हणून सचिन भादुले यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ महादेव जाधव यांनी काम पाहिले.


No comments:

Post a Comment