गुळंब येथे वनविभागाच्यावतीने शंभर महिलांना गॅसचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

गुळंब येथे वनविभागाच्यावतीने शंभर महिलांना गॅसचे वाटप

गुळंब येथे वनविभागाच्यावतीने महिलांना गॅसचे वाटप करताना आमदार श्री. पाटील व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी. 


चंदगड / प्रतिनिधी

         पाटणे वनपरिक्षेत्र अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती गुळंब यांचे वतीने जिल्हा वार्षीक नियोजन समिती अंतर्गत शंभर महिला कुटुंब प्रमुखांना स्वयंपाक गॅसचे वितरण आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी आमदार श्री. पाटील  यांनी  गॅस वापराबाबत काळजी घेणे बाबत सुचना केल्या. प्र.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, यांनी वनसंरक्षणात वनविभागास सहकार्य करणेबाबत विनंती केली. यावेळी वनसमिती अध्यक्ष भिकाजी गोंडे, वनसमिती कोदाळी अध्यक्ष अंकुश गावडे, सचिव तथा वनपाल कळसगादे बी. आर. भांडकोळी, वनरक्षक एम. एस. खोत, जी. पी. वळवी, वनसेवक तुकाराम गुरव, मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर, अशोक कदम यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवासंस्था, पदाधिकारी व ग्रामस्थ व कांचन गौरी इंडेन गॅस वितरक सचिन मुळीक उपस्थित होते.No comments:

Post a Comment