जागतिक वनदिनी पाटणे परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांचा आमदारांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

जागतिक वनदिनी पाटणे परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांचा आमदारांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव

 

पाटणे (ता. चंदगड) येथे वनदिनानिमित उत्कृष्ट योगदान येणार्या वन कर्मचा-यांचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान, शेजारी वनपाल दत्ता पाटील व इतर.

चंदगड / प्रतिनिधी

          पाटणे वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यरत वनपाल, वनरक्षक, वनसेवक यांना सन 2020-21 मध्ये वने, वन्यजीव व पर्यावरण संरक्षण व संवर्धनात अनन्यसाधारण योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा आमदार राजेश पाटील यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  

        प्र. वनक्षेत्रपाल पाटणे यांचे संकल्पनेतुन तिन्ही ऋतु ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रानावनात अथक परिक्षम करणाऱ्या वनयोध्यांचा सन्मान करणेसाठी, 21 मार्च 2021 चे जागतिक वनादिनाचे औचित साधुन वनपाल -4 , वनरक्षक -14 , वनसेवक -9 , इतर कर्मचारी -4 अशे एकुण -31 जणांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानपत्रामुळे आम्ही केलेल्या कामाची दाद मिळाली व अधिक काम करण्याची जबाबदारी वाढली असलेची भावना वनकर्मचारी यांनी व्यक्त केली. वन कर्मचाऱ्यांच्या सांघिक कार्याचे कौतुक करून वनविभाग व वनकर्मचारी हा शासनाच्या अन्य विभागापेक्षा दुर्लक्षित असुन त्यांच्या हक्क व न्यायासाठी आपण प्रयत्न करणार असलेचे आमदार श्री. पाटील यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment