अडकूर येथे दूकान गाळे बंद केल्याने सख्या भावात मारामारी - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

अडकूर येथे दूकान गाळे बंद केल्याने सख्या भावात मारामारी

 


 चंदगड /प्रतिनिधी :-- 

अडकुर ता.चंदगड येथे बस स्टॉप वर असलेले   दुकान गाळे जबरदस्तीने बंद केल्याच्या कारणावरून सख्या भावा-भावात व पुतण्या मध्ये  मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रत्नप्रभा जयंत देसाई (वय 43 वर्षे,  रा. अडकुर, ता.चंदगड) यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

 याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कि अडकूर येथे बस स्टॉप वर असलेल्या दूकान गाळे व गट नं १८६/१मधील शेत जमिनीबाबत  जयंत खंडेराव देसाई व विजय खंडेराव देसाई, अजितसिंह प्रदीप देसाई यांच्यात पूर्वीपासून वाद सूरू आहे. दरम्यान काल विजय देसाई व अजितसिह देसाई व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दूकान गाळे बंद केले, याबाबत रत्नप्रभा देसाई यांनी 

 हे दूकान गाळे का बंद केला अशी विचारणा करत असताना अजितसिंह देसाई, विजय देसाई व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी हाॅकीच्या  स्टीक ने आपणा सह पती जयंत देसाई, मूलगा दिग्विजय याना माराहण करून जखमी केले .याबाबत ची फिर्याद रत्नप्रभा देसाई यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.No comments:

Post a Comment