संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वत्र राजकीय वातावरण थंडीतही तापले आहे. आज अर्ज माघारीच्या दिवशी जिल्हा परिषदेमध्ये १७ तर पंचायत समिती ५८ असे एकूण ७५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण ९ उमेदवार तर पंचायत समितीसाठी २६ असे एकूण ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
जिल्हा परिषदमध्ये अडकूर गटातून ८, माणगाव गटातून २, कुदनुर गटातून ६ तर तुडये गटातून १ असे एकूण १७ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत.
पंचायत समितीमध्ये गवसे गणातून १, अडकूर गणातून १६, माणगाव गणातून ६, कोवाड गणातून ०, कुदनुर गणातून १३, तुर्केवाडी गणातून १०, तुडये गणातून ४ व हेरे गणातून ८ असे एकूण ५८ अर्ज माघारी घेण्यात आले आहे.
चंदगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), वंचित बहजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष या प्रमुख पक्षासह अपक्षही रिंगणात आहेत.
तालुक्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अडकूर गटामध्ये भाजप, काँग्रेस व घड्याळ अशी तिरंगी लढत होत आहे. पंचायत समितीमध्ये गवसे गणामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी तिरंगी लढत तर अडकूर गणामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), वंचित बहुजण आघाडी व राष्टीय समाज पक्ष यांच्या बहुरंगी लढत होत आहे. तर माणगाव, कुदनूर व तुडये गटात भाजप व घड्याळ यामध्ये थेट दुरंगी लढत होत आहे.
माणगाव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माणगाव गटामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुहेरी लढत होत आहे. माणगाव गणामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी तिहेरी लढत होत आहे. कोवाड गणामध्येही तिहेरी लढत होत असली तरी यामध्ये भाजप, घड्याळ व अपक्ष यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
कुदनुर जिल्हा परिषद गटामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्या दुरंगी थेट लढत होत आहे. कुदनुर गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व दोन अपक्षामध्ये चौरंगी लढत होत आहे. तुर्केवाडी गणामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट दुरंगी लढत होत आहे.
तुडये जिल्हा परिषद गटामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्या दुरंगी थेट लढत होत आहे. तुडये पंचायत समिती गणामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुहेरी थेट लढत होत आहे. हेरे पंचायत समिती गणामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व बंचित बहुजन आघाडी यांच्यात तिहेरी लढत होत आहे.
गट क्रमांक ६५ – अडकूर (जिल्हा परिषद)
(आरक्षण: सर्वसाधारण महिला)
१. राजश्री लक्ष्मण गावडे (भाजप, कमळ)
२. शितल विठ्ठलराव देसाई (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात)
३. अलकनंदा अंबादास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
निर्वाचन गण क्रमांक १२९ – गवसे (पंचायत समिती)
(आरक्षण : अनुसूचित जाती - महिला)
१. मनस्विनी महादेव कांबळे (भाजप, कमळ)
२. रेणुका दीपक कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
३. सिंधु अनंत कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात)
निर्वाचन गण क्रमांक १३० – अडकूर (आरक्षण : सर्वसाधारण)
१. शिवाजी सतबा तुपट (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात)
२. हणमंतराव दत्ताजीराव देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
३. रविंद्र नामदेव बांदिवडेकर (भाजप, कमळ)
४. उदय रावसाहेब मंडलिक (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल)
५. अंकुश गोपाळ कांबळे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर)
६. दयानंद मारुती परीट (राष्ट्रीय समाज पक्ष, ट्रॅक्टर)
गट क्रमांक ६६ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
१. मानसी कल्लाप्पा भोगण (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
२. मनिषा अनिल शिवनगेकर (भाजप, कमळ)
निर्वाचन गण क्रमांक १३१ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग)
१. विलास दत्तात्रय नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
२. सागर मल्लिकार्जुन मुगेरी (भाजप, कमळ)
३. संतोष कृष्णा पाटील (अपक्ष, गॅस सिंलेडर)
निर्वाचन गण क्रमांक १३२ – कोवाड
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
१. सुवर्णा चंद्रकांत कुंभार (भाजप, कमळ)
२. गिता राणबा बामणे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
३. उज्वला विलास नाईक (अपक्ष, पाण्याची टाकी)
गट क्रमांक ६७ – कुदनूर (आरक्षण : सर्वसाधारण महिला)
१. ज्योती दीपक पाटील (भाजप, कमळ)
२. विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
निर्वाचन गण क्रमांक १३३ – कुदनुर (सर्वसाधारण)
१. मधुकर हणमंत आंबेवाडकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
२. कमल आनंद देसाई (भाजप, कमळ)
३. किरण कल्लापा कोले (अपक्ष, खटारा)
४. गजानन तुकाराम सुतार (अपक्ष, नारळ)
निर्वाचन गण क्रमांक १३४ – तुर्केवाडी (सर्वसाधारण)
१. शिवाजी जोतीबा तुपारे (भाजप, कमळ)
२. पांडुरंग कृष्णा बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
गट क्रमांक ६८ – तुडये
आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
१. रचना मष्णू गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
२. स्वरा सचिन बल्लाळ (भाजप, कमळ)
गण १३५ तुडये आरक्षण : सर्वसाधारण महिला
१. कोमल जोतीबा पाटील (भाजप, कमळ)
२. प्रेमा जगन्नाथ हुलजी (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
गण क्रमांक १३६ – हेरे (आरक्षण : सर्वसाधारण महिला)
१. निर्मला अंकुश गवस (भाजप, कमळ)
२. संज्योती संतोष मळवीकर (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ)
३. मिनाक्षी मनोहर कांबळे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर)

No comments:
Post a Comment