शिवणगे – लक्कीकट्टे येथे श्री जक्कूबाई देवी यात्रा २ फेब्रुवारीला - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2026

शिवणगे – लक्कीकट्टे येथे श्री जक्कूबाई देवी यात्रा २ फेब्रुवारीला

 

 जक्कूबाई देवी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        शिवणगे–लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री जक्कूबाई देवीची वार्षिक यात्रा सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रद्धा व भक्तिभावाने साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        यात्रेच्या दिवशी दुपारी ठीक ३ वाजता देवीचा पारंपरिक गाऱ्हाणा विधी संपन्न होणार असून, या धार्मिक विधीसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त देवस्थान परिसरात विशेष सजावट करण्यात येत असून, ग्रामस्थांनी एकत्र येत तयारीला वेग दिला आहे.

        श्री जक्कूबाई देवीच्या कृपेसाठी दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेत सहभागी होत असतात. यावर्षीही यात्रेच्या निमित्ताने धार्मिक विधी, दर्शन  यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान कमिटी शिवणगे–लक्कीकट्टे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

        यात्रेमुळे गावातील सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा मिळत असून, ग्रामस्थांमध्ये आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment