गडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणाचे काम असेल तर थेट चंदगडचे आमदार शिवाभाऊंना भेटा, तुम्हाला मुख्यमंत्री साहेब थेट भेटतील. आणि हेही सांगतो की, मलाही मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्यास मी सुद्धा कधीतरी शिवाभाऊंची मदत घेतो, सर्वच नेत्यांना जवळचे आणि आवडणारी काही व्यक्तिमत्व असतात, अशा माणसांपैकी शिवाभाऊंचा समावेश आहे, असे मत चक्क राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
यामुळे आमदार शिवाभाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री किती घनिष्ठ आहे, याचे अत्यंत या प्रसंगातून येते.
जनता दलाच्या गडहिंग्लज येथील नेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी रविवारी (दि. 25) रोजी गडहिंग्लज येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, उपस्थित होते.

No comments:
Post a Comment