बिबट्याचा हल्ला, तरुणाने वाचवले भावाचे प्राण, ही घटना कुठे घडले ? वाचा..., सी. एल. न्यूज ! - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2026

बिबट्याचा हल्ला, तरुणाने वाचवले भावाचे प्राण, ही घटना कुठे घडले ? वाचा..., सी. एल. न्यूज !

 


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा 

      शेतात गेलेल्या तरुणावर अचानकपणे मका पिकात लपून बसलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला केला. मात्र त्याचा आरडाओरडा ऐकून शेजारी असणाऱ्या रस्त्यावर थांबलेल्या भावाने भावा जवळ जाऊन बिबट्याच्या हल्ल्यापासून भावाला वाचवले. ही घटना सातवे गावाजवळील शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथे खोमणे नावाच्या शेतात घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे, ऋतुराज जयवंत शिंदे (वय 22 रा. शिंदेवाडी ता. पन्हाळा). या गावाजवळ खोमणे शेतमळा म्हणून शेत आहे. या ठिकाणी हा तरुण व त्याचा भाऊ रविराज हे रविवारी (25 जानेवारी 2026) सायंकाळी सहा वाजता मक्का पीक पाहून वैरण आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी रविराज हा जवळच्या रस्त्यावर थांबला होता, तर ऋतुराज मका पिकाची पाहणी करण्यासाठी मका पिका जवळ गेला.  त्यावेळी अचानकपणे बिबट्या आला आणि त्याने हल्ला चढवला त्याला प्रतिकार करत ऋतुराज यांने आरडाओरड केली. ऋतुराज याचा आवाज ऐकू आल्याने रस्त्यावर थांबलेला रविराज ऋतुराज जवळ गेल्यामुळे बिबट्या पळून गेला. यादरम्यान ऋतुराज याच्या गालावर तसेच कानाजवळ मोठी जखम केली. यामुळे त्या तरुणाला वाचवण्यासाठी भावाने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर जखमी तरुणावर सीपीआर, कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment