चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीबाबत प्रचारसभा घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंग होत असताना अपघात होवून आग लागून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत आणखी पाच जण असल्याची माहिती प्राथमिक रित्या माहिती पोलीस खात्याने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोकसागरात बुडाला.
बारामती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अजित पवार गेले होते. गोजुबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चंदगडचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील हे प्रमुख कार्यकर्त्यांसह बारामतीकडे निघाले आहेत. या अपघातामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर दुःखाचे सावट पसरले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील विधानसभा काळात चंदगड तालुक्यात कोट्यावधींच्या निधी दिला आहे अनेक गावांना रस्ते मिळाले, अनेक योजनांचा लाभ झाला. त्यांच्या निधनामुळे चंदगड तालुक्यातील हजारो कार्यकर्ते तसेच चाहत्यांना दुःख अनावर झाले आहे.


No comments:
Post a Comment