अजित पवार यांच्या जाण्यामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - संभाजीराव देसाई, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अजित पवार यांची शोकसभा - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2026

अजित पवार यांच्या जाण्यामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - संभाजीराव देसाई, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अजित पवार यांची शोकसभा

चंदगड : सी एल वृत्तसेवा

      लोकनेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असा शोक राष्ट्रीय काँग्रेसचे चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई - शिरोलीकर यांनी व्यक्त केला.

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने चंदगड येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांची शोकसभा झाली. यावेळी ते बोलत होते. 

      एम. जे. पाटील म्हणाले, अजित दादा पवार यांनी गट न मानता विकास कामांचा सपाटा लावला. चंदगड तालुक्यातील ही अनेक कामाला भरघोस निधी मिळाला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 ताम्रपर्णी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम चव्हाण - पाटील यांनीही अजित पवार यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा देत शोक व्यक्त केला.

यावेळी उदय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब देसाई, ॲड. अनंत कांबळे, नारायण हसबे, सिंधू कांबळे, शिवाजी तुप्पट,  शीतल देसाई, राजश्री देसाई, राष्ट्रीय काँग्रेस आयटी सेलचे सागर पाटील, मल्लू गावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment