दौलत-अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2021

दौलत-अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना पितृशोक

 

गणपती खोराटे 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना चालवायला घेतलेल्या अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचे वडील गणपती परसू खोराटे (वय वर्षे ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे सुना, नातवंड असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि १२ सप्टेंबर रोजी सकाळी आहे. मुंबईत सर्वसामान्य गिरणी कामगार म्हणून काम करताना त्यांनी सामाजिक कार्यातसुद्धा ठसा उमटवला. मुंबई ग्रामस्थ मंडळ हालेवाडीचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते. १९९० च्या सुमारास गिरणी व्यवसाय बंद पडल्यानंतर ते गावाकडे परतले. १९९० च्या सुमारास गिरणी व्यवसाय बंद पडल्यानंतर ते गावाकडे परतले. हालेवाडी-उत्तूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या आर्थिक सोयीसाठी सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत त्यांच्या सहभाग राहिला. या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. हालेवाडी परिसरातील गोरगरीब नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला. स्वतःच्या दोन मुलांना उच्चशिक्षित केले. गोवा पोलिस दलातील रवींद्र खोराटे यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन रविवार दि १२ सप्टेंबर रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment